हिंदु राष्‍ट्रातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या स्‍वरूपाविषयी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. मी त्‍यांना विचारलेले प्रश्‍न आणि त्‍यांची त्‍यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

श्री. दीप संतोष पाटणे

१. मी गुरुदेवांना म्‍हणालो, ‘‘आता सर्वत्र भ्रष्‍टाचार, दंगली, बलात्‍कार, असे अनेक प्रसंग घडतात आणि त्‍या प्रकारची वृत्ते आपल्‍याला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये पहायला मिळतात. पुढे हिंदु राष्‍ट्रात हे सर्व न्‍यून होईल.’’ त्‍यावर गुरुदेव मला म्‍हणाले, ‘‘नष्‍ट होईल (असे सर्व प्रसंग हिंदु राष्‍ट्रात न्‍यून न होता पूर्णपणे नष्‍टच होतील) !’’

२. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे स्‍वरूप हिंदु राष्‍ट्रात कसे असेल ?’, असे मी विचारल्‍यावर गुरुदेव म्‍हणाले, ‘‘छान प्रश्‍न विचारलास ! घडी बसेपर्यंत काही काळ जाईल. त्‍यानंतर ‘इकडे चांगले झाले, तिकडे चांगले झाले’, अशा चांगल्‍या बातम्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये पहायला मिळतील.’’

– श्री. दीप संतोष पाटणे (वय २१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.