परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ७८ व्‍या जन्‍मोत्‍सवाचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आलेल्‍या अनुभूती

पू. (कै.) माधव साठे

अ. ‘सोहळा पहातांना माझा भाव सतत जागृत होत होता.

आ. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि सद़्‍गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी गायलेले गीत ऐकत असतांना मला भरून येत होते. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर गीत म्‍हणत असतांना ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले समोर उभे आहेत’, असे मला जाणवत होते.

इ. परात्‍पर गुरु डॉक्‍टर सर्वांना प्रत्‍येक प्रसंगात स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाच्‍या प्रक्रियेचे महत्त्व सांगून स्‍वयंसूचना देण्‍यास सांगत होते. ते ऐकून माझ्‍यातील प्रक्रियेचे गांभीर्य वाढले.

ई. ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी संतांना कसे घडवले ?’, हे ऐकतांना मला दाटून येत होते.’

– श्री. माधव साठे (आताचे पू. (कै.) माधव साठे), कल्‍याण, ठाणे. (वर्ष २०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक