उत्तर कोरियाने परमाणु आक्रमण केल्यास त्याला विनाशकारी प्रत्युत्तर देऊ !

अमेरिकेची उत्तर कोरियाला चेतावणी !

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – जर उत्तर कोरियाच्या साम्यवादी सरकारने दक्षिण कोरिया अथवा अमेरिका यांच्यावर परमाणु आक्रमण केले, तर त्यास विनाशकारी प्रत्युत्तर दिले जाईल. तसेच तेथील सत्ता संपुष्टात आणली जाईल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली.

सध्या दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल हे अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. ते आणि बायडेन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर ही भूमिका मांडण्यात आली. या बैठकीत बायडेन यांनी दक्षिण कोरियाला आण्विक कवच देण्याची घोषणाही केली. या वेळी दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी अण्वस्त्रांशी संबंधित करारावर स्वाक्षरी केली.