भाग्यनगर येथील मशिदीच्या आवारात ‘जय श्रीराम’ची रिंगटोन वाजल्याने ३ जणांना पोलिसांनी घेतले कह्यात !

मक्का मशिद

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील चारमीनार जवळील मक्का मशिदीच्या आवारात असतांना एका तरुणाच्या भ्रमणभाषची रिंगटोन वाजली. ही रिंगटोन ‘जय श्री राम’ असे गाणे होते. यामुळे येथे उपस्थित मुसलमानांनी या तरुणासह ३ जणांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. ‘या तिघांनीही मद्यप्राशन केले होते’, असे सांगण्यात येत आहे. ‘हे तिघेही शुद्धीवर आल्यानंतर त्यांची चौकशी करून ते मशिदीच्या आवारात का गेले होतेे, याची माहिती घेतली जाणार आहे’, असे पोलिसांनी सांगितले. १८ मे २००७ या दिवशी या मशिदीच्या ठिकाणी नमाजपठणाच्या वेळी झालेल्या स्फोटात ९ जण ठार, तर ५८ जण घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

  • हिंदू आपल्या मंदिरांमध्ये नमाजपठण, इफ्तारच्या मेजवान्या करण्यासाठी मुसलमानांना आमंत्रित करतात आणि त्यांचा आत्मघातकी सर्वधर्मसमगाव दाखवात, तर मुसलमान हिंदूंच्या देवताचे नावही मशिदीमध्ये कुणी ऐकवले, तर त्याला विरोध करतात ! याविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?
  • गेली अनेक दशके संपूर्ण देशात ५ वेळ मशिदीमधून ऐकवली जाणारी अजान हिंदू ऐकत आहेत, तर काही क्षण वाजणारी ‘जय श्रीराम’ची रिंगटोन मुसलमान का ऐकू शकत नाहीत ?