उत्तराखंडमधील मुसलमानांच्या अवैध झोपडपट्टीद्वारे नदीमध्ये प्रदूषण !

  • विरोध करणार्‍या नागरिकांना मुसलमानांकडून शिवीगाळ

  • पोलिसांनी गुन्हा नोंद करत ठोठावला ५ सहस्र रुपयांचा दंड !

अल्मोडा (उत्तराखंड) – येथील रानीखेत भागात सरकारी भूमीवर मुसलमानांच्या एका अवैध झोपडपट्टीतील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक लोकांचा आरोप आहे की, या अवैध झोपडपट्टीमध्ये रहाणार्‍या लोकांच्या नाल्याचे पाणी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या लोकांना येथील काही मुसलमान विरोध करतांना दिसत आहे. ‘तुमच्या बापाची भूमी आहे का ?’ असे म्हणत मुसलमान शिवीगाळ करतांना दिसत आहेत. या व्हिडिओवरून उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका मुसलमानावर ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हा नाला बंद केल्याची माहिती पोलिसांनी ट्वीट करून दिली आहे. ‘पोलिसांनी ठोठावलेला दंड पुष्कळच अल्प आहे’, असे अनेकांनी ट्वीट करत म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

  • अवैध झोपडपट्टी होईपर्यंत आणि तेथून नदीचे प्रदूषण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
  • उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !