हिंदूंच्या धार्मिक भावनांचा दुखावणारे मौलाना अर्शद मदनी यांच्यावर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदू संघटनांकडून बेंगळुरू येथील गिरिनगर पोलीस निरीक्षकांना तक्रार !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदू संघटनांकडून बेंगळुरू येथील गिरिनगर पोलीस निरीक्षकांना निवेदन देताना

बेंगळुरू (कर्नाटक) – देहलीच्या रामलीला मैदानात १० ते १२ फेब्रुवारी या काळात जमियत उलेमा-ए-हिंदच्या ३४ व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी ‘ॐ आणि अल्ला दोन्ही एकच आहेत’, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य हिंदु धर्म आणि हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा यांचा अवमान करणारे होते. मौलाना अर्शद मदनी यांच्यावर समस्त हिंदू एकता संघटनांच्या वतीने बेंगळुरू येथील गिरिनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्तेे श्री. मोहन गौडा, राष्ट्रीय हिंदु परिषदेचे श्री. सुरेश गौडा, गिरीश कुमार, उदय शेट्टी, विक्रम शेट्टी, बजरंग दलाचे श्री. राघवेंद्र, प्रा. एन्. उमाशंकर, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह सर्व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. मदनी यांनी ‘अ‍ॅडम आणि मनु दोन्ही एकच आहेत’, असेही वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या.

संपादकीय भूमिका 

हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?