भारताने लेहमध्ये आयोजित केली जी-२० बैठक !

चीन अनुपस्थित रहाण्याची शक्यता

नवी देहली – यंदाचे ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताला मिळाले असून पुढील जी २० परिषदेची बैठक लेहमध्ये आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये ८० देश सहभागी होणार आहेत. याआधी अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे जी-२० च्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीवर चीनने बहिष्कार घातला होता. त्यामुळे आगामी बैठकीलाही तो बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.