छत्रपती संभाजीनगर – किराडपुरा भागात धर्मांधांच्या २ गटांत झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. २९ मार्च या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, श्रीरामनवमीच्या सणाच्या आदल्या रात्री शहरातील किराडपुरा भागात दुर्दैवी घटना घडली. ज्यामध्ये पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांच्या भूमिकेवर किंवा हिंसाचाराच्या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण घटनेची निवृत्त न्यायाधिशांच्या वतीने उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावे, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे.
संपादकीय भूमिकाआता तरी पोलिसांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊन ते त्यांच्यावर कारवाई करतील का ? |