बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कर्मचार्याला खडसावले
रायगड – श्रीरामनवमीच्या दिवशी येथील ‘कर्जत डी मार्ट’मध्ये खरेदीसाठी गेलेल्या हिंदु ग्राहकाच्या कपाळाचा टिळा येथील कर्मचार्यांनी पुसायला लावला. हा धक्कादायक प्रकार समजताच बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘कर्जत डी मार्ट’मध्ये जाऊन टिळा पुसायला सांगणार्या मुख्य कर्मचार्याला तंबी दिली.
सौजन्य युवा सारथी
‘टिळा कोणत्या कारणामुळे पुसायला सांगितला ?’, याविषयी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विचारल्यावर कर्मचार्याची बोलती बंद झाली. ‘आम्ही सर्व धर्मांना समान लेखतो. धर्मामध्ये भेदभाव नको; म्हणून टिळा पुसायला सांगितला’, असे थातूरमातूर उत्तर कर्मचार्याने दिले. त्यावर ‘तेथे असलेल्या एका मुसलमान ग्राहकाने घातलेली टोपी का काढायला सांगितली नाही ?’, याविषयी विचारणा केल्यावर दुकानातील कर्मचारी निरूत्तर झाला. अशा प्रकारे पुन्हा कुणा हिंदूंना टिळा पुसायला सांगितल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची तंबी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कर्मचार्याला दिली. (हिंदूंच्या धर्माचरणावर गदा आणणार्यांना जाब विचारणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल भारतात हिंदूंवर अशी वेळ येते, हे संतापजनक ! |