(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राच्या वातावरणामुळेत खलिस्तानी अमृतपाल खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस करतो !’ – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत

काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे हिंदुद्वेषी विधान !

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत

जयपूर (राजस्थान) – देशातील वातावरण हिंदु राष्ट्राच्या संदर्भात निर्माण करण्यात आल्याने खलिस्तानी अमृतपालचे खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस झाले आहे, असे विधान राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. ‘अमृतपाल म्हणतो की, पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हिंदु राष्ट्राची मागणी कशी काय करू शकतात ? ’, असेही गहलोत म्हणाले.

 (सौजन्य : Amar Ujala)

मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी खलिस्तानची मागणी मान्य न केल्यानेच त्यांची हत्या झाली. आता देशात धर्माचे राजकारण केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे विदेशात याचसाठी स्वागत होते कारण ते म. गांधी यांच्या देशात रहातात. (गहलोत यांचा जावईशोध ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदु राष्ट्राच्या वातावरणामुळे एकटा-दुकटा अमृतपाल खलिस्तानची मागणी करत असेल, तर देशातील कोट्यवधी हिंदूंची हिंदु राष्ट्राची मागणी कुणी नाकारू शकत नाही, हे गहलोत यांनी लक्षात ठेवावे !
  • खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला मोठे करण्याचे राष्ट्रघातकी काम काँग्रेसने केले होते, याविषयी गहलोत का बोलत नाहीत ? गहलोत या माध्यमातून एकप्रकारे अमृतपालच्या कृत्याचे समर्थनच करत आहेत, हे लक्षात घ्या !