‘एकदा मी भोजनकक्षात प्रसाद ग्रहण करत असतांना माझी पू. पद्माकर होनपकाकांशी भेट झाली होती. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘पू. काका, माझे व्यष्टी साधनेचे नियोजन दुपारी महाप्रसादाच्या वेळेपर्यंत व्यवस्थित होते. त्यानंतर होत नाही.’’
त्यांनी मला विचारले, ‘‘याचे कारण काय ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मला महाप्रसाद ग्रहण केल्यावर पुष्कळ झोप येते.’’ माझे बोलणे ऐकून ते म्हणाले, ‘‘तुम्ही महाप्रसाद ग्रहण करण्याआधी ‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे, श्रीविष्णु हा वास आहे आणि भोक्ता हा शिव आहे’, अशी प्रार्थना करून महाप्रसाद ग्रहण करा.’’ (अन्नं ब्रह्मा रसो विष्णुः भोक्ता देवो महेश्वरः । एवं ज्ञात्वा तु यो भुङ्क्ते अन्नदोषो न लिप्यते ।। अर्थ : अन्न ब्रह्मदेव आहे, रस (अन्नाचे सत्त्व) भगवान विष्णु आहे आणि भोजन करणारे भगवान शिव आहे, असे जाणून जो अन्नग्रहण करतो, त्याला अन्नदोष लागत नाही.)
त्या दिवसापासून मला दुपारी झोप यायची बंद झाली. ही अनुभूती मला पू. होनपकाकांच्या कृपेने आली. ती मी त्यांच्याच चरणी अर्पण करते.’
– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.११.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |