महाराष्ट्र लव्ह जिहादमुक्त करून सर्वांत कडक धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – नितेश राणे, आमदार, भाजप

आमदार नितेश राणे,

कोल्हापूर – लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांनाही याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्याने आणि प्रबोधन यांद्वारे प्रयत्न केला जात आहे. हिंदु समाज धर्म परिवर्तनासाठी कुणावरही बळजोरी करत नाही. धर्मांतर विरोधात चालू असलेली लढाई सोपी नाही. लव्ह जिहाद करण्यासाठी मुसलमान तरुणांना लाखो-करोडो रुपये दिले जातात. त्यामुळे यापुढील काळात महाराष्ट्र लव्ह जिहादमुक्त करून महाराष्ट्रात सर्वांत कडक धर्मांतरविरोधी कायदा करणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी दिली. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

१. औरंगाबादचे नाव पालटल्यानंतर स्टेट्सच्या माध्यमातून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.

२. परदेशात जाऊन देशाची अपकीर्ती करणार्‍या राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा आणि राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवा.

३. सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात लँड जिहाद चालू आहे. अनधिकृत धार्मिक स्थळे उभी करायची आणि हिंदूंना तेथून निघून जाण्यास भाग पाडायचे, असे प्रकार चालू आहेत.