
चिपळूण – राष्ट्रीय कृषी विकास योजना भात लागवड आणि गुणवत्ता सुधार प्रकल्पाअंतर्गत येथील अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात २९ आणि ३० मार्चला जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात विविध कृषी उत्पादने, यंत्रसामुग्री, खते बी-बियाणे, महिला बचतगटांची उत्पादने, असे विविध ५५ कक्ष लावण्यात येणार आहे. यासमवेतच भातपिकांचे विविध वाण, भातपिकासाठी यांत्रिकीकरण, तसेच लागवड कापणी, मळणी, काढणीपश्चात तंत्रज्ञान यांचे विविध आस्थापनांचे अवजारे उपलब्ध असतील. भातपिकासाठी पाककला प्रशिक्षणवर्ग, तृणधान्य पिकांच्या पाककला स्पर्धा होतील. यामध्ये नाचणी, वरी, ज्वारी, हरिक, बाजरी या धान्यांपासून तयार करण्यात येणारे विविध प्रकार पाककला स्पर्धेत ठेवण्यात येतील. प्रथम ३ विजेत्या महिलांना साडी, सन्मानचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तसेच सहभागी सर्वांना प्रमाणपत्र मिळणार आहे.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. इच्छुकांना २८ मार्चपर्यंत ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे. या वेळी तृणधान्यापासून विविध पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील राजश्री सावंत या २९ मार्च या दिवशी मार्गदर्शन करण्यास उपस्थित रहाणार आहेत. या वेळी भातपिक उत्पादन घेणारे शेतकरी, महिला, महिला बचतगट आणि नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
भात लावणीच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त
कोकणातील हापूस आंब्याच्या संकटावर महाराष्ट्र शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी !
सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकर्यांकडून मंत्रालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी
‘महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगा’चे अध्यक्ष पाशा पटेल ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित !