दरभंगा (बिहार) – बिहारच्या दरभंगा शहरातील मौलागंजमध्ये ‘हिंदु राष्ट्र’ लिहिलेला ध्वज लावण्यात आल्याचे समोर आले आहे. हा फलक आक्षेपार्ह असल्याचे सांगत पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या फलकाविषयी ‘ऑल इंडिया मुस्लिम बेदारी कारवां’ नावाच्या संघटनेने २२ मार्च २०२३ या दिवशी दरभंगाच्या जिल्हा न्यायदंडाधिकार्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (मुसलमानांनी तक्रार नोंदवल्यावर तत्परतेने गुन्हा नोंदवून घेणारे पोलीस पीडित हिंदूंनी मुसलमानांच्या विरोधात तक्रार नोंदवल्यावर गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
दरभंगा के एक मोहल्ले में लगा ‘हिंदू राष्ट्र’ लिखा झंडा, पुलिस ने ‘आपत्तिजनक पोस्टर’ बता दर्ज किया केस: मुस्लिम संगठन ने पत्र लिखकर चेताया था#Bihar #HinduRashtrahttps://t.co/8yTuLCvHyx
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 24, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलागंज येथे काही समाजकंटकांनी नवरात्रीच्या निमित्ताने आक्षेपार्ह फलक लावून सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडवल्याविषयी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात ‘हिंदु राष्ट्रा’चा ध्वज फडकावून परिसरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. (हिंदु राष्ट्र नाव असलेला फलक लावल्याने शांतता कशी काय भंग होते ? मुसलमानांचा हिंदुद्वेेष यातून दिसून येतो ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारतात ठिकठिकाणी धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जातात, तसेच पाकिस्तानचा ध्वज फडकावला जातो. त्या वेळी मुसलमान संघटना झोपा काढत असतात का ? |