गोवा : स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण करणारे वडील पोलिसांच्या कह्यात !

(प्रतिकात्मक चित्र)

वास्को, २३ मार्च (वार्ता.) – स्वतःच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी वास्को पोलिसांनी तिच्या ४१ वर्षीय वडिलांना कह्यात घेतले आहे. संशयित वडिलांच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे द्योतक !