जिनांनी मुसलमान देश घेतला, आता जे शेष आहे, ते केवळ हिंदु राष्ट्र आहे ! – साक्षी महाराज

बरेली (उत्तरप्रदेश) – मौलाना तौकीर रझा यांनी नमाज पठणाविषयी बोलतांना  ‘आम्ही जिथे आहोत तिथे नमाज पठण करू, पोलिसांना गुन्हा दाखल करायचा असेल तर करा’, असे धमकीवजा शब्दांत विधान केले. यावर भाजपचे माजी खासदार साक्षी महाराज म्हणाले की, जिनांनी मुसलमान देश घेतला. त्यामुळे आता जे शेष राहिले आहे, ते केवळ हिंदु राष्ट्र आहे.

टीव्ही 100 उत्तरप्रदेश 

मौलाना तौकीर रझा यांनी ‘आम्ही तिरंगा यात्रा काढून लवकरच देहलीत जाऊ. नमाजच्या वेळी रस्त्यावर नमाज पठण करू. सरकारला जी काही कारवाई करायची असेल, त्याने ती आतापासूनच करावी. जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरू तेव्हा कुणाचेच ऐकणार नाही’, असेही विधान केले. देहलीला जाण्यापूर्वी मौलाना तौकीर रझा यांच्यासह ५ जणांना ७२ घंट्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. तौकीर रझा यांनी १५ मार्चला देहलीला जाण्याची घोषणा केली होती.

मौलाना तौकीर रझा हे दंगेखोर ! – विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची

विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची

वर्ष २०१० मध्ये बरेलीमध्ये जी दंगल झाली होती, ती मौलाना तौकीर रझा यांनीच केली होती, हे देशाला ठाऊक आहे. ते दंगेखोर आहेत, असे बरेलीतील विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. हा २०२३चा उत्तरप्रदेश आहे. मुख्यमंत्रीपदी योगी बाबा बसले आहेत. त्यांच्याकडे सर्वांची चिकित्सा होतेे, असे साध्वी पुढे म्हणाल्या.