अमरावती येथील शिवजयंती शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

खासदार नवनीत राणा यांच्याकडून समितीच्या कार्याचे कौतुक

खासदार नवनीत राणा यांच्यासह समितीचे कार्यकर्ते

अमरावती, १२ मार्च (वार्ता.) – जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून शिवजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी विविध उपक्रम राबवून शोभायात्रा काढण्यात येते. यंदाची शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि मूर्ती यांचे पूजन अन् महाआरती करून काढण्यात आली. यात विविध पारंपरिक देखावे करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच मार्गात विविध ठिकाणी शंखनाद आणि पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेच्या अध्यक्षपदी खासदार नवनीत राणा होत्या. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ते, मान्यवर यांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभाग घेतला. श्री. सुधीर बोपुलकर आणि त्यांचे सहकारी प्रतिवर्षी या उपक्रमाचे आयोजन करतात.

विशेष : शोभायात्रेमध्ये हिंदु जनजागृती समितीने सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून खासदार नवनीत राणा यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.