महाराष्ट्रात येत्या ५ दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता !

हिमालयातील बर्फवृष्टीचा परिणाम !

मुंबई – येत्या ५ दिवसांत राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने पिकांची पुष्कळ हानी झाली. कांदा, गहू, फळबागा आणि भाजीपाला यांची पिके भुईसपाट झाली. हिमालयासह उत्तर भारतातील पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. प्रतितास ३० ते ४० किमी वेगाने वार्‍याचा वेग असेल. विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.