‘१५ दिवसांपूर्वी माझे मन पुष्कळ अस्वस्थ होते. कोणतेही उपाय करून ते शांत होत नव्हते. अशा स्थितीत मी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील ध्यानमंदिरात गेलो. तेथे श्री दुर्गादेवीला आत्मनिवेदन केल्यावर तिने माझ्यावर कृपाकटाक्ष टाकला आणि माझे मन शांत झाले. मला अडचणीच्या वाटणार्या गोष्टी हळूहळू सोप्या होऊ लागल्या. माता भगवतीच्या चरणी कृतज्ञता म्हणून मला पुढील कविता सुचली. ती माता भगवती आणि गुरुदेव यांच्या चरणी अर्पण करत आहे.’
न राहे मम मन अनुसंधानी ।
हेची कारण अशांततेसी ।।
भवसागरी जीवननौका ।
घेई हेलकावे कारण भयासी ।। १ ।।
ऐशा घोर समयीं ।
धावूनी येई माता भगवती ।।
करिता आत्मनिवेदन तिजसी ।
त्रिविध तापे दूर जाहली ।। २ ।।
दाविला मार्ग मज गुरुचरणांचा ।
हीच खूण तिच्या कृपेची ।।
शांतवी मज दयार्द्र भगवती ।
म्हणे करीन पूर्ण मनोरथ तुझे ।। ३ ।।
परि करोनी सावध या लेकरासी ।
सांगे नच सोडण्या गुरुचरण कदापि ।।
गुरुसेवा हेच ब्रीद जीवनाचे ।
रहावे नित्य शरणागत गुरुचरणी ।। ४ ।।
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०२३)
|