बेंगळुरू येथील अर्जुन सी. यांनी लहानपणापासून विविध प्रसंगांत अनुभवलेली गुरुकृपा !

श्री. अर्जुन सी.

१. मांसाहार करणार्‍या कुटुंबात जन्‍म झाला असूनही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने शाकाहारी असणे

‘माझा जन्‍म मांसाहार करणार्‍या कुटुंबात झाला. माझ्‍या आई-वडिलांच्‍या कुटुंबांतील सर्व जण मांसाहारी आहेत, तरीही मी शाकाहारी आहे. आमच्‍या दोन्‍ही कुटुंबात केवळ आम्‍हीच (मी, माझी आई (सौ. जयलक्ष्मी सी.) आणि माझी धाकटी बहीण (कु. अर्पिता सी.) शाकाहारी आहोत. हे केवळ गुरुदेवांच्‍या कृपेनेच साध्‍य झाले आहे.

२. गुरुदेवांनी आईच्‍या माध्‍यमातून साधकावर लहानपणापासूनच चांगले संस्‍कार करणे

मी लहान असल्‍यापासूनच गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्‍या आईच्‍या माध्‍यमातून मला ‘शाकाहाराचे महत्त्व आणि मांसाहाराचे दुष्‍परिणाम’ यांविषयी योग्‍य रीतीने ज्ञान दिले आहे. आईने मला लहानपणापासूनच योग्‍य वेळी धर्माचरणाचे महत्त्व, धर्मजागृती इत्‍यादी धर्मासंबंधित सर्व विषय सांगितले. माझ्‍या सभोवताली दारू घेणारे लोक असूनही मला ‘दारूचे सेवन करावे’, असे कधीच वाटले नाही.

३. मी माझ्‍या वडिलांना साधनेचे महत्त्व सांगितले. आता तेही नामजप करत आहेत.

४. मित्र विदेशात जात असतांना त्‍याला सनातन-निर्मित श्रीकृष्‍णाचे चित्र भेट देणे आणि त्‍याच्‍या विचारांत पालट होऊन तो साधना करू लागणे

माझा मित्र मनोज कुमारस्‍वामी उच्‍च शिक्षण घेण्‍यासाठी जर्मनी येथे जात असतांना त्‍याच्‍या अन्‍य मित्रांनी त्‍याला भेटवस्‍तू दिल्‍या. मी त्‍याला सनातन-निर्मित श्रीकृष्‍णाचे चित्र भेट दिले आणि सांगितले, ‘‘तू अभ्‍यास करतांना हे श्रीकृष्‍णाचे चित्र तुझ्‍या पटलावर ठेव.’’ त्‍यानंतर काही मासांपूर्वी त्‍याने मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मला तुझ्‍या चेहर्‍यावर चैतन्‍य जाणवले; म्‍हणून मी तुझ्‍याशी मैत्री वाढवली. तू मला श्रीकृष्‍णाचे चित्र दिल्‍यापासून माझे जीवनच पालटले आहे.’’

तो माझ्‍या आईला म्‍हणाला, ‘‘काकू, तुमच्‍या मुलाने मला श्रीकृष्‍णाचे चित्र दिल्‍यानंतर माझे जीवनच पालटले आहे. मी सनातन संस्‍थेला धनरूपात किंवा अन्‍य रूपात साहाय्‍य करू शकतो. मी एका मठात जाऊन दीक्षाही घेतली आहे.’’

त्‍याचे बोलणे ऐकून मला आश्‍चर्य वाटले. केवळ श्रीकृष्‍णाच्‍या एका चित्राने माझ्‍या मित्रामध्‍ये एवढा पालट झाला. हे चित्र सामान्‍य नसून सनातन-निर्मित असल्‍याने हे परिवर्तन घडले. अशा रितीने माझ्‍या माध्‍यमातून धर्मप्रचार करून घेतल्‍यामुळे मी गुरुचरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

५. अनुभूती

५ अ. वाहन चालवतांना ‘स्‍वतःभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना केल्‍याने अनेक वेळा अपघातांमध्‍ये रक्षण होणे : मी वाहन चालवतांना ‘माझ्‍याभोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना करतो. मला याचा पुष्‍कळ लाभ झाला आहे. मी अनेक वेळा मोठ्या अपघातांतून वाचलो आहे, तर कधी अपघात होता होता वाचलो आहे. हे केवळ श्रीकृष्‍णाच्‍या सुदर्शनचक्रामुळे साध्‍य झाले. त्‍याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

५ आ. परीक्षेच्‍या वेळी नामजपादी उपाय केल्‍यामुळेे चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणे : ‘मी ‘पी.यु.सी.’ (प्री युनिर्व्‍हसिटी कोर्स) द्वितीय वर्षाच्‍या परीक्षेत अनुत्तीर्ण होईन’, अशी मला भीती वाटत होती. परीक्षेची सिद्धता करण्‍यासाठी मला २ – ३ मास सुटी मिळाली असूनही मला पुष्‍कळ भीती वाटत होती. त्‍या वेळी गुरुदेव माझ्‍या आईच्‍या माध्‍यमातून माझ्‍या समवेत राहिले आणि त्‍यांनीच माझ्‍याकडून नामजपादी उपाय करून घेतले. मी त्‍या परीक्षेत ७४ टक्‍के गुण मिळवून चांगल्‍या प्रकारे उत्तीर्ण झालो.’

– श्री. अर्जुन सी., राजाजीनगर, बेंगळुरू, कर्नाटक. (७.१.२०२२)