सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी दिलेले अनमोल दृष्‍टीकोन

आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे

१. सेवा आणि परिस्‍थिती यांना देव मानून शरण जाऊन प्रार्थना करायला हवी. परिस्‍थिती कशीही असली, तरीही मनाच्‍या स्‍थितीत पालट व्‍हायला नको.

२. विचार हे केवळ पाण्‍यावरच्‍या बुडबुड्यांप्रमाणे असतात. ते काही क्षणांत विरून जातात; म्‍हणून केवळ विचार नको, तर कृतीच केली पाहिजे. बोलणे अल्‍प आणि कृती अधिक असायला हवी.

३. ‘साधक आणि सेवा’ ही देवाने आपल्‍याला दिलेली श्रीमंती आहे. साधकांच्‍या अडचणी प्राधान्‍याने सोडवल्‍या पाहिजेत. साधक ही गुरुदेवांची संपत्ती आहे. आपण साधकांवर प्रीती करायला हवी.’

– आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्‍पा कोठावळे (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), कोल्‍हापूर. (१६.३.२०२२)