गड-दुर्गांकडे दुर्लक्ष करणे म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या कर्तृत्‍वाकडे दुर्लक्ष करणे होय !

हिंदुस्‍थानला मोगलांच्‍या अत्‍याचारातून आणि अन्‍यायातून सोडवून स्‍वराज्‍य खेचून आणणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना परमप्रिय असलेल्‍या गड-दुर्गांचे पावित्र्य जोपासा !

छत्रपती शिवाजी महाराज की जय । हर हर महादेव ।

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या कीर्तीने अवघ्‍या दिशा दुमदुमल्‍या ! त्‍यांची तत्त्वनिष्‍ठता, त्‍यांचे कर्तृत्‍व, त्‍यांची जिद्द सगळेच अवर्णनीय ! महाराजांचा हा आदर्श सर्वांनी घ्‍यायला हवा. त्‍यांचे केवळ घेतले, तरी सर्वांनाच स्‍फुरण चढते. अशा सर्वांसाठीच प्रेरणादायी असणार्‍या शिवरायांनी उभारलेल्‍या गड-दुर्गांचे जतन आणि संवर्धन व्‍हायला हवे. त्‍यांकडे दुर्लक्ष करणे; म्‍हणजे शिवाजी महाराजांच्‍या कर्तृत्‍वाकडे दुर्लक्ष करणेच आहे. प्रत्‍येकाने जागरूक राहून गड-दुर्गांच्‍या संवर्धनासाठी संघटित होऊन प्रयत्न करावेत !

– श्री. कुशल उत्तम गुरव, रामनाथी आश्रम, गोवा.