उदय भेंब्रे यांनी शिवप्रेमींची क्षमा मागावी !

  • कोकणी साहित्‍यिक उदय भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्‍याचे प्रकरण

  • कुंकळ्ळी येथील चिफ्‍टन स्‍मारक येथे शिवप्रेमींची सार्वजनिक सभेत मागणी

सार्वजनिक सभेतील उपस्‍थिती

कुंकळ्ळी, ४ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्‍याच्‍या प्रकरणी कोकणी साहित्‍यिक उदय भेंब्रे यांनी गोमंतकियांची क्षमा मागावी, अशी मागणी कुंकळ्ळी येथील चिफ्‍टन स्‍मारक (पोर्तुगिजांच्‍या विरोधात बलीदान दिलेल्‍या कुंकळ्ळीतील १६ महानायकांचे स्‍मारक) येथे शिवप्रेमींच्‍या सार्वजनिक सभेत करण्‍यात आली.

कुंकळ्ळी येथील चिफ्‍टन स्‍मारक येथे जमलेले शिवप्रेमी

‘अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजा’ने या सभेचे आयोजन केले होते. या सभेला गोव्‍यातील विविध भागांतून शिवप्रेमी एकत्र आले होते. या वेळी विविध वक्‍त्‍यांनी म्‍हटले की, कोकणी साहित्‍यिक उदय भेंब्रे हे समाजात द्वेष निर्माण करून लोकांमध्‍ये फूट पाडत आहेत. कोकणी साहित्‍यिक उदय भेंब्रे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अशाच प्रकारे अवमान करणारे व्‍हिडिओ प्रसारित केले आहेत. उदय भेंब्रे यांनी गोमंतकियांची सार्वजनिकरित्‍या क्षमा मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी प्रसारित केलेला अवमानकारक व्‍हिडिओ यू ट्यूबवरून काढून टाकावा.

आज डिचोली येथे निषेध सभा

डिचोली – प्रमाणित इतिहासाचा विपर्यास करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी चुकीची आणि अवमानकारक वक्‍तव्‍य करणारे कोकणी साहित्‍यिक उदय भेंब्रे यांचा तीव्र शब्‍दांत निषेध करण्‍यासाठी डिचोली येथील समस्‍त शिवप्रेमींनी ५ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान, डिचोली येथे एका सार्वजनिक सभेचे आयोजन केले आहे.