अबू आझमी यांना औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे ! – नितेश राणे, बंदरे विकास मंत्री

नितेश राणे आणि अबू आझमी

मुंबई – अबू आझमी यांना औरंग्याविषयी एवढे प्रेम आहे, तर अशा माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे. त्याच्यावर फक्त निलंबनाची कारवाई करणार का ? अबू आझमीसारख्या माणसाची कबर औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला खोदली पाहिजे, असे विधान भाजपचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. अबू आझमी यांच्या विधानावरून ते बोलत होते.