महिलांना मासिक पाळीच्या कालावधीत सुटी मिळण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली

याचिकाकर्त्याला सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा आदेश

नवी देहली – नोकरदार महिला आणि विद्यार्थिनी यांना मासिक पाळीच्या कालावधीत सुटी मिळण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयाने २४ फेबु्रवारी या दिवशी फेटाळून लावली. देहलीत रहाणारे शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती.

सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड म्हणाले की, हे प्रकरण सरकारी धोरणाशी निगडित आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याने या प्रकरणी सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाशी संपर्क साधवा.

त्रिपाठी यांनी या याचिकेत म्हटले होते की, मासिक पाळीच्या कालावधीत महिला आणि विद्यार्थिनी यांना अनेक शारीरिक अन् मानसिक अडचणींना सोमोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना सुटी दिली जावी आणि तसा आदेश न्यायालयाने द्यावा.

अनेक देशांत दिली जाते सुटी !

अशा प्रकारची सुटी देशात चीन, जपान, इंग्लंड, वेल्स, तैवान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्पेन आणि जाम्बिया या देशांमध्ये दिली जात असल्याचाही संदर्भ याचिकाकर्त्याने याचिकेत दिला होता.