‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हा सिद्धांत स्‍वतःवरील आवरण काढतांनाही अनुभवणारे फोंडा (गोवा) येथील श्री. नीलेश पाध्‍ये !

श्री. नीलेश पाध्‍ये

मी देवासमोर बसून माझ्‍यावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढत असतांना माझ्‍या मनात पुढील विचार आले, ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ आणि ‘ब्रह्मांडी ते पिंडी’, असे आपल्‍याला पूर्वीपासून वेगवेगळ्‍या उदाहरणांमधून शिकवले गेले आहे. त्‍यामुळे जेव्‍हा आपण आपल्‍या देहावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढतो, तेव्‍हा आपण एकप्रकारे या ब्रह्मांडातील प्रत्‍येक कणावर आलेले रज-तमाचे आवरण काढत असतो. त्‍यामुळे आपण आवरण काढत असतांना कळत-नकळत आपले घर, घरातील माणसे आणि वस्‍तू यांवरील आवरण दूर होत असते.

‘परात्‍पर गुरुदेवांनी आपल्‍याला सूक्ष्मातील केवढे मोठे आयुध दिले आहे !’, याची जाणीव होऊन मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. ‘माझ्‍याकडूनही स्‍वतःवरचे आवरण नियमित काढले जाऊ दे आणि ही अनमोल सेवा माझ्‍याकडून होऊ दे’, हीच गुरुदेवांच्‍या चरणी प्रार्थना !’

– श्री. नीलेश पाध्‍ये, फोंडा, गोवा. (८.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक