‘मला गेल्या ७ वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. मी आधुनिक वैद्यांचे उपचार घेत होते, तरीही माझ्या रक्तातील साखरेची पातळी उपाशीपोटी १७५ ते १९० पर्यंत होती. (निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी उपाशीपोटी अनुमाने ७० ते १०० अशी असते.) माझ्यावर वैद्यकीय उपचार चालू असूनही माझे रक्तातील साखरेचे प्रमाण न्यून होत नव्हते. मला अंग थरथरणे, दरदरून घाम फुटणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, डोके बधीर होणे, असे त्रास होत होते. त्यानंतर मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘मधुमेह’ या व्याधीवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांविषयी वाचले. त्यात ‘श्री दुर्गादेव्यै नमः । – श्री हनुमते नमः ।’ हा नामजप १ घंटा १ मास करावा’, असे लिहिले होते.
१. आरंभी नामजप करतांना ‘नामजप करू नये’, असे वाटणे आणि गोड खाण्याची इच्छा होणे, सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी नामजप चालू ठेवण्यास सांगणे
३.११.२०२२ या दिवसापासून मी हा नामजप नियमित करत आहे. आरंभी हा नामजप करत असतांना मला गोड खाण्याची इच्छा होत असे आणि ‘हा नामजप करू नये’, असे वाटून माझा संघर्ष होत असे. मी याविषयी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तुम्हाला असा त्रास होत आहे, याचा अर्थ तुम्हाला हा जप लागू पडत आहे. ‘तुम्ही हा जप करू नये’, यासाठी वाईट शक्ती अडथळे आणत आहेत. तुम्ही नामजप चालू ठेवा.’’
२. मी पुन्हा जप करू लागले. मी २० दिवसांनी रक्तातील साखरेची पातळी तपासली. तेव्हा ती न्यून झाल्याचे लक्षात आले. आता माझी उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी १२० ते १२५ एवढी झाली आहे आणि माझी गोड खाण्याची इच्छाही अल्प झाली आहे.
मला असलेला मधुमेह वैद्यकीय औषधांनी नियंत्रणात येत नव्हता; परंतु सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांनी ते शक्य झाले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने मला ही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. पल्लवी म्हात्रे, कामोठे, रायगड (२७.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |