हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त काढण्‍यात आलेल्‍या वाहन फेरीमुळे कोल्‍हापूर शहर हिंदुत्‍वमय !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍पहार अर्पण करतांना श्री. सुरेश यादव (डावीकडे), श्री. शिवानंद स्‍वामी, श्री. किरण दुसे, तसेच श्री. रामभाऊ मेथे

कोल्‍हापूर – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने रविवार, १२ फेब्रुवारी या दिवशी खरी कॉर्नर येथील पद्माराजे गर्ल्‍स हायस्‍कूल येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या निमित्ताने १० फेब्रुवारी या दिवशी शहरात वाहनफेरी काढण्‍यात आली. प्रारंभी मिरजकर तिकटी येथे हिंदु धर्माचे प्रतीक असणार्‍या धर्मध्‍वजाचे पूजन शिवसेना करवीरतालुकाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) श्री. राजू यादव यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. पूजेचे पौरोहित्‍य वेदमूर्ती शतानंद कात्रे यांनी केले. यानंतर कोळेकर तिकटी, पाण्‍याचा खजिना, पद्माराजे गर्ल्‍स हायस्‍कूल, विष्‍णुपंत इंगवले कमान, गांधी मैदान, निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे मिरजकर तिकटी येथे फेरीचा समारोप झाला. फेरीच्‍या मार्गात ठिकठिकाणी फेरीचे स्‍वागत करण्‍यात आले. या फेरीसाठी सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांची वंदनीय उपस्‍थिती होती.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त कोल्हापूर येथे काढण्यात आलेल्या वाहनफेरीत ८५ दुचाकी आणि १७० धर्मप्रेमींचा सहभाग होता.

फेरीच्‍या प्रारंभी धर्मध्‍वजाचे पूजन करतांना श्री. राजू यादव (उजवीकडे टोपी घातलेले)
फेरीच्‍या समारोपप्रसंगी घोषणा देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्मप्रेमी

फेरीच्‍या समारोपप्रसंगी हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. शरद माळी, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्‍या सौ. राजश्री तिवारी आणि हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले. या फेरीसाठी धर्मप्रेमी श्री. सूरज राजपूत आणि त्‍यांचे सहकारी, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, ऋणमातृभूमी संघटनेचे श्री. राजू गडकरी, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्‍हापूरे, भाजप सहकार आघाडी जिल्‍हाध्‍यक्ष श्री. सुनील कुंभार, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ कमलाकर किलकिले, तसेच शिये, भुये, शिरोली, कसबा सांगाव या गावांमधील धर्मप्रेमी फेरीसाठी उपस्‍थित होते.

कोल्‍हापूर येथील सभेच्‍या प्रसारासाठी काढण्‍यात आलेली वाहनफेरी
कोल्‍हापूर येथील सभेच्‍या प्रसारासाठी काढण्‍यात आलेली वाहनफेरी
कोल्‍हापूर येथील सभेच्‍या प्रसारासाठी काढण्‍यात आलेली वाहनफेरी
कोल्‍हापूर येथील सभेच्‍या प्रसारासाठी काढण्‍यात आलेली वाहनफेरी
फेरीत घोषणा देतांना चि. ओम सागर हंकारे (वय ५ वर्षे)

विशेष

१. अनेक ठिकाणी समाजातील लोक फेरी थांबून पहात होते, तसेच भ्रमणभाषवर त्‍याचे चित्रीकरण करत होते.

२. फेरीच्‍या मार्गात अर्धशिवाजी पुतळा चौक येथे श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे जिल्‍हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी आणि श्री. किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीला पुष्‍पहार अर्पण केला.