१. जाणवलेली सूत्रे
अ. ‘वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या वेळी सनातनने आयोजित केलेल्या प्रदर्शनस्थळी येणारे सर्व जिज्ञासू तेथील प.पू. गुरुमाऊलींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र पहाताच त्यांना नमस्कार करत होते.
आ. विविध संत-महंत प्रदर्शनस्थळी येत असत. साधक संतांच्या काही आखाड्यांमध्ये गेल्यावर तेथील आखाड्यांचे प्रमुख साधकांना प्रसाद देत असत.
२. आलेल्या अनुभूती
अ. हरिद्वारला जातांना मला २ दिवस दूर पल्ल्याच्या आगगाडीने प्रवास करायचा होता. मला इतक्या प्रवासाची सवय नसूनही कंटाळा जाणवला नाही.
आ. तिथे आमची निवासव्यवस्था गंगामातेच्या समोर ‘श्री बडे हनुमान’ या आश्रमात केली होती. ‘त्या वेळी गंगामातेने आम्हा साधक बालकांना आपल्या कुशीत घेतले आहे आणि ती आमचे रक्षण करत आहे’, असे वाटत होते.
इ. एकदा ग्रंथप्रदर्शनाची सेवा करत असतांना सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी स्वतःच्या हाताने आम्हाला प्रसाद भरवला. त्या वेळी मला प.पू. भक्तराज महाराज यांची आठवण झाली.’
– श्री. जयेश शेट्ये, लांजा, जिल्हा रत्नागिरी. (३.५.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |