भाईंदर येथे धर्मांधाकडून तरुणीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण !

थुंकी चाटायला लावली

प्रतिकात्मक छायाचित्र

भाईंदर (ठाणे) – येथील काशिमीरा भागात तरुणीला प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून तिच्‍यावर बलात्‍कार आणि मारहाण करून संपूर्ण प्रकाराचा व्‍हिडिओ चित्रीत करण्‍यात आला. या प्रकरणी आरोपी इम्‍तियाज चौधरी याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. यात पाठपुरावा करणार्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांकडून लव्‍ह जिहादचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्‍यात आली असून आरोपीविरोधात गुन्‍हा नोंद झाला आहे.

१. एका मैत्रिणीच्‍या सांगण्‍यावरून पीडितेने इम्‍तियाजशी मैत्री केली. प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवून त्‍याने तिच्‍याशी लैंगिक संबंध ठेवले. पीडितेने त्‍याला विवाहाविषयी विचारल्‍यावर त्‍याने नकार दिला.

२. ‘माझ्‍याशी संबंध न ठेवल्‍यास घरच्‍यांचेही बरेवाईट करीन’, अशी धमकीही त्‍याने तिला दिला.

३. काही कालावधीने त्‍याने पीडितेला भेटायला बोलवले. एका हॉटेलमध्‍ये नेऊन तिला पट्‍ट्याने मारहाण केली. लाथाबुक्‍क्‍यांनीही मारहाण केली. तिचा गळाही दाबला. त्‍याने स्‍वतःची थुंकी भूमीवर टाकून तिला ती चाटायला लावली.

संपादकीय भूमिका 

  • ठाण्‍यात ‘लव्‍ह जिहाद’ !
  • तरुणींनो, धर्मांधांच्‍या प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकून आयुष्‍याची हानी ओढावून घेण्‍यापेक्षा वेळीच सतर्क व्‍हा !