काश्मीरमध्ये आतंकवाद्याकडून परफ्यूम बाँब जप्त !

झाकण उघडताच होतो स्फोट !

(परफ्यूम म्हणजे सुगंधी द्रव्य)

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या आरिफ या आतंकवाद्याकडून परफ्यूम बाँब जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलांच्या म्हणण्यानुसार, या परफ्यूमच्या डब्याचे झाकण उघडताच किंवा ते दाबताच त्याचा स्फोट होतो. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये प्रथमच सुरक्षादलांनी अशा प्रकारचा परफ्यूम बाँब जप्त केला आहे.

२१ जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या नरवालमध्ये २ बाँबस्फोट झाले होते. यात ९ जण घायाळ झाले होते. स्फोट घडवणार्‍या आरिफ याला पोलिसांनी अटक केली आहे. तो त्याला आदेश देणार्‍या पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याच्या संपर्कात होता. तो रियासी येथील रहिवासी आहे. आरिफ सरकारी शिक्षक आहे. तो गेल्या ३ वर्षांपासून लष्कर-ए-तोयबाच्या हस्तकांच्या संपर्कात होता.