देवदरी, अंभेरी (जिल्‍हा सातारा) येथे शिव रुद्राभिषेक आणि सहस्र बिल्‍वार्चन सोहळा पार पडला !

श्री कार्तिकस्‍वामी

सातारा, १ फेब्रुवारी (वार्ता.) – कृतिका नक्षत्र आणि सोमवार या निमित्ताने देवदरी, अंभेरी येथील श्री कार्तिकस्‍वामी आश्रमात शिव रुद्राभिषेक आणि सहस्र बिल्‍वार्चन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला, अशी माहिती मठपती पू. परशुराम महाराज वाघ यांनी दिली. या वेळी देवदरी, अंभेरी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.