देहलीमध्ये मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार

  • धर्मांतर करण्यासाठी दबाव

  • घरी बोलावून फळांच्या रसातून गुंगीचे औषध देऊन केले कृत्य !

नवी देहली – येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी देहली विश्‍वविद्यालयातील विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी आरोपी शाकीब याच्याविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

पीडितेची मैत्रीणीच्या माध्यमातून शाकीबशी ओळख झाली होती. त्याने या अल्पवयीन मुलीला त्याच्या घरी बोलावून फळांचा रस प्यायला दिला. त्यात त्याने गुंगीचे औषध मिसळल्याने मुलगी बेशुद्ध पडली. यानंतर शकीबने तिच्यावर बलात्कार केला आणि त्या घटनेचा व्हिडिओ काढला, तसेच छायाचित्रे काढली. त्याद्वारे नंतर तो तिला लग्नासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी ब्लॅकमेल करत होता.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !