आपण सर्व हिदु राजांनी एकत्र येऊन दिल्लीपती बादशाहच्‍या विरुद्ध लढा दिला पाहिजे !

छत्रपती संभाजीराजांचे मिर्झा राजे जयसिंह याच्‍या मुलाला लिहिलेल्‍या पत्रातील उद़्‍गार !

छत्रपती संभाजी राजांनी मिर्झा राजे जयसिंह याच्‍या मुलास म्‍हणजे रामसिंगास पत्र लिहिले होते. त्‍यात म्‍हटले आहे, ‘‘आपण सर्व हिंदु राजांनी एकत्र येऊन दिल्लीपती बादशाहच्‍या विरुद्ध लढा दिला पाहिजे. आपण हिंदु काय दुबळे किंवा तत्त्वहीन झालो आहोत ? आपल्‍या देवालयांची मोडतोड झाली, तरी आपण स्‍वधर्म रक्षण करण्‍यास असमर्थ आहोत. ‘आपण धर्माचरणशून्‍य आहोत’, अशी त्‍या यवन बादशाहाची समजूत झाली आहे. अशा वेळी आपण एक होऊन त्‍या यवनाला कारागृहात डांबले पाहिजे. देवालय स्‍थापन करून धर्माचे रक्षण केले पाहिजे.’’ (संदर्भ : संकेतस्‍थळ)