‘राजा भोज आध्यात्मिक व्यक्ती होती. त्याला असे वाटत होते की, प्रजेचे ज्ञान वाढावे, आनंद वाढावा, माधुर्य वाढावे आणि मृत्यूनंतर नव्हे, तर जिवंतपणीच प्रजेने अध्यात्मातील तत्त्वांचा आनंद लुटावा. महाकवी कालीदासही त्यांच्या राजसभेतील (दरबारातील) कवी होते. तेथे असे प्रश्न विचारले जात की, ज्यामुळे प्रजेचा विवेक वाढेल. श्रीमंत लोक वाटून खात असत. गरीब लोक श्रीमंतांना पाहून ईर्ष्या करत नसत. ते ज्ञानातच तृप्त रहात असत. त्यांचे राज्य अध्यात्मातील तत्त्वांवर आधारित राज्य होते. जसे रामराज्य, कृष्णराज्य… अगदी तसेच त्यांच्या पदचिन्हांवर चालणारा भोज राजा होता.’
(संदर्भ : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जुलै २०१३)