हिंदु साम्राज्‍याचा पाया रचणारे सम्राट हरिहर आणि बुक्‍कराय !

शंकराचार्य विद्यारण्‍यस्‍वामी यांच्‍या मार्गदर्शनाखाली विजयनगरच्‍या साम्राज्‍याची मुहूर्तमेढ रोवणारे हरिहर आणि बुक्‍कराय यांनी विजयनगरच्‍या वैभवशाली हिंदु साम्राज्‍याचा पाया रचला. (इ.स. १३३६ ते १३७६)

हरिहर आणि बुक्‍कराय यांच्‍या सुसज्‍ज सेनेने दक्षिण भारतात धुमाकूळ घालणार्‍या मोगल आक्रमकांना निस्‍तेज केले. हरिहर यांच्‍या निधनानंतर सम्राट बुक्‍कराय यांनी मदुरेच्‍या सुलतानाशी केलेल्‍या घनघोर लढाईत सुलतान मारला गेला आणि दक्षिण भारत बुक्‍करायांच्‍या अधिपत्‍याखाली आला. सम्राट बुक्‍कराय यांनी वैदिक धर्माच्‍या पुनरुज्‍जीवनासाठी देशभरातील विद्वानांना एकत्र करून वेदग्रंथांवर नवी भाष्‍ये लिहून घेतली आणि हिंदु धर्मात बळावलेल्‍या दुष्‍प्रवृत्तींना आळा घातला. (१४.८.२००७)