मुंबई, २६ जानेवारी (वार्ता.) – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसलमानांसाठी नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्रपणे प्रार्थनाकक्ष बांधण्यात आल्याची वृत्ते काही सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाली. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने याविषयी माहिती घेतली असता हे प्रार्थनास्थळ सर्वधर्मियांसाठी असल्याचे कळाले. हिंदू नामजप, प्रार्थना किंवा ध्यानधारणा यांसाठी या प्रार्थनस्थळाचा वापर करत नाहीत; मात्र मुसलमान नमाजपठणासाठी नियमित वापर करत असल्यामुळे हे प्रार्थनास्थळ केवळ मुसलमानांसाठीच असल्याचा अपसमज निर्माण झाला आहे.
या प्रार्थनाकक्षात स्वच्छतागृह, बसण्यासाठी बाकडे, दिवे, पंखे आदी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रार्थनेसाठी अशा प्रकारचे कक्ष असतात.
महंतांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !
नाशिक येथील महंत श्री मंडळाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे याविषयी तक्रारही केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केवळ मुसलमानांसाठी प्रार्थनास्थळ (प्रेयर रूम) बनवण्याचा प्रकार गंभीर असल्याचे नमूद करत या ठिकाणी हिंदूंना पूजेसाठी भव्य मंदिर, ख्रिस्त्यांंसाठी चर्च आणि बुद्धांसाठी बौद्धविहार बांधण्याची मागणी केली आहे.
प्रार्थना कक्षाची माहिती देणार्या फलकावरील चित्र मुसलमानधार्जिणे !याठिकाणी प्रार्थना कक्षाची माहिती देणार्या फलकावर मुसलमान नमाजपठणाच्या बसतात तशा पद्धतीने, म्हणजे गुडघ्यावर बसलेल्या व्यक्तीचे चित्र दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मुसलमानांना समोर ठेवूनच हा प्रार्थनाकक्ष बांधण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळेही येथे मुसलमानेतर लोक येत नसल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. संपादकीय भूमिका : एरव्ही सर्वधर्मसमभावासाठी उर बडवणारे आता याविषयी काही बोलत का नाहीत ? जाणीवपूर्वक असा फलक बनवणार्यांची नावे जनतेसमोर उघड करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ! |
संपादकीय भूमिका
|