भारतात बहुसंख्‍य हिंदूंवर अन्‍याय ! – सद़्‍गुरु नीलेश सिंंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तरप्रदेशमधील सैदपूर, तसेच बिहारचे पाटलीपुत्र आणि समस्‍तीपूर येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभांचे आयोजन

पाटलीपुत्र (बिहार) – भारत स्‍वयंभू हिंदु राष्‍ट्र आहे. संपूर्ण जगात बहुसंख्‍य समाजाचे हित पाहून निर्णय घेतले जातात आणि त्‍यांना राजकीय संरक्षण दिले जाते; परंतु आपल्‍या देशात बहुसंख्‍यांकांसाठी ना कोणता आयोग आहे, ना कोणते कल्‍याण मंत्रालय आहे. याउलट लव्‍ह जिहाद, भूमी जिहाद, धर्मांतर, गोहत्‍या, मंदिरांचे सरकारीकरण इत्‍यादी दिवसेंदिवस वाढत आहेत.

सद़्‍गुरु नीलेश सिंंगबाळ

हिंदूंचा बुद्धीभेद करून हिंदुत्‍व नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे हिंदूंना संघटित करण्‍याविना कोणताही पर्याय नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंंगबाळ यांनी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत केले.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तरप्रदेशमधील सैदपूर येथील दयानंद बालमंदिर विद्यालय, बिहार राज्‍यातील समस्‍तीपूरच्‍या मगरदहीमधील बनारस स्‍टेट कँपस आणि पाटलीपुत्रच्‍या अनिसाबादमधील चित्रगुप्‍त सभागृह अशा ३ ठिकाणी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. या सभांमध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या सौ. प्राची जुवेकर यांनी उपस्‍थितांना ‘ईश्‍वरी अधिष्‍ठानाची आवश्‍यकता’, याविषयी संबोधित केले.

क्षणचित्रे

१. पुष्‍कळ थंडी असतांनाही अनेक धर्मप्रेमी सभेला आले होते, तसेच काही जण सभेनंतरच्‍या बैठकीसाठी थांबले.
२. बरनवाल समाजाचे अध्‍यक्ष श्री. रानू वनवास सभेमुळे प्रभावित झाले. तसेच त्‍यांनी समितीच्‍या पुढील कार्यक्रमांना साहाय्‍य करण्‍याची सिद्धता दर्शवली.
३. सैदपूर येथील स्‍पोर्ट्‌स अकॅडमीचे प्रशिक्षक श्री. अमित सिंह, तसेच श्री. मोहित मिश्रा यांनी त्‍यांच्‍या गावात धर्मसभा घेण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली.
४. धर्मशिक्षण वर्गातील एका धर्मप्रेमीने त्‍यांच्‍या परिचितांना सभेला येण्‍याचे निमंत्रण दिले, तसेच ओळखीच्‍या माध्‍यम प्रतिनिधींनाही त्‍यांनी बोलावले.