काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून हिंदु नाव धारण करून ‘फेसबुक’वरून हिंदु धर्मावर अपमानजनक टीका !

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींच्या विरोधात केली होती अपमानास्पद वक्तव्ये !

अफजल लखानी

कर्णावती – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिरबा मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्ये करणार्‍या काँग्रेसच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे निमंत्रक अफजल लखानी यांना कारागृहात डांबण्यात आले होतेे. आता त्यांच्या विरोधात नवीन प्रकरण पुढे आले आहे. फेसबुकवर ‘जिगर ठक्कर’ या हिंदु नावाने खोटे खाते खोलून हिंदु धर्म, ब्राह्मण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर अश्‍लाघ्य टीका करत असल्याचे समोर आले आहे. याविरोधात हिंदु सेनेच्या कार्यकर्त्याने जामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी अफजल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. (याचा अर्थ तक्रार केली नसती, तर गुन्हा नोंदवण्यात आला नसता का ? – संपादक)

अफजल यांनी ‘जिगर ठक्कर’ या नावाने प्रसारित केलेल्या लिखाणामध्ये ‘संघ ही भारतात कार्यरत असणारी एकमेव आतंकवादी संघटना आहे’, ‘नथुराम गोडसे हा भारतातील पहिला आतंकवादी आहे’, ‘ब्राह्मण समाज हा मुसलमान, दलित, रजपूत यांच्या विरोधात कार्य करत आहे’, अशा आशयाची वक्तव्ये प्रसारित केली आहेत.

संपादकीय भूमिका

धर्मांध आता हिंदु नावे धारण करून हिंदु धर्माच्या विरोधात आपत्तीजनक विचार प्रसारित करतांना दिसत आहेत. असे करून ते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा आणि त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांमध्येही धर्मांध तरुण हिंदु नावे धारण करून हिंदु युवतींची फसवणूक करतात. हिंदु नावे धारण करून राष्ट्रविरोधी आणि हिंदुविरोधी कारवाया करण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र असून ते रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !