धर्मांधांच्या वाढत्या कारवायांच्या निषेधार्थ ३ दिवस आजरा (जिल्हा कोल्हापूर) बंद : ६ जानेवारीला मोर्चा !

आजरा (जिल्हा कोल्हापूर) – गेल्या काही दिवसांपासून आजरा परिसरात धर्मांधांकडून हिंदु युवती आणि हिंदु युवक यांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे. ३ जानेवारीला हिंदु युवतीची धर्मांधांकडून छेड काढण्यात आली होती. त्यामुळे सातत्याने होणार्‍या धर्मांधांच्या कारवायांच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांकडून ३ दिवस ‘आजरा बंद’चे आवाहन करण्यात आले आहे. अशा घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, या मागणीसाठी ६ जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • धर्मांधांनी मांडलेला उच्छाद गावागावांपर्यंत पोचत आहे. हिंदु मुला-मुलींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वरक्षणासाठी सिद्ध होणे अत्यावश्यक !
  • धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला जात असतांना पोलीस प्रशासन निष्क्रीय कसे ?