‘सकल हिंदु जनआक्रोश मोर्चा’द्वारे सांगोल्यात तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन !

सांगोला (जिल्हा सोलापूर), १५ डिसेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर या हिंदु युवतीचे ३५ तुकडे करून निर्घृण हत्या करणार्या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे. अशा घटना रोखण्यासाठी कठोर लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा, या मागणीसाठी ‘सकल हिंदु समाज’ सांगोला तालुक्याच्या वतीने १५ डिसेंबर या दिवशी हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्च्याच्या प्रारंभी महात्मा फुले चौकात माजी सैनिक रावसाहेब साळुंखे यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. यानंतर शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मोर्च्याचा समारोप तहसील कार्यालय येथे करण्यात आला. समारोप प्रसंगी श्री. संतोष भोसले आणि हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सुनीता दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले, तसेच हिंदु देवता, संत, राष्ट्रपुरुष आणि महापुरुष यांचा अवमान करणार्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

या वेळी सर्वश्री अभियंता संतोष भोसले, डॉ. मानस कमलापूरकर, अनिल वाघमोडे, प्रवीण जानकर, ओंकार कुलकर्णी, मयुरेश गुरव, अतुल चव्हाण, सागर मोहिते, नवनाथ कावळे, संतोष पाटणे, पत्रकार नागेश जोशी, लक्ष्मीकांत लिगाडे, डॉ. गणपतराव मिसाळ, नारायण मिसाळ, डॉ. अनिल कांबळे, अरविंद केदार, वैभव देशमुख, प्रतीक पवार, ओम स्वामी, संजय गव्हाणे, महेश चौधरी, संतोष सोनंदकर, महेश गवळी, मधुकर पवार, अच्युत फुले, घेवाराम, गणपत पटेल यांसह शेकडो धर्मप्रेमी महिला आणि पुरुष उपस्थित होत्या. मोर्च्याची सांगता डॉ. मानस कमलापूरकर यांनी सर्वांचे आभार मानून केली.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)