आसाममधील मुसलमानबहुल गावातील एकमेव हिंदु कुटुंबाला हाकलून लावण्यासाठी धर्मांधांनी घर जाळले !

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्याकडून संरक्षण देण्याचा आदेश !

मोरीगाव (आसाम) – येथील लहरीघाट भागातील एका मुसलमानबहुल गावात एकमेव हिंदु कुटुंबाला तेथून हाकलून लावण्याचा आणि त्याची भूमी हडपण्यासाठी त्याला त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. मुसलमानांनी या कुटुंबाचे घर जाळून टाकले. ‘जर तुम्ही तेथून निघून गेला नाहीत, तर तुम्हाला ठार मारण्यात येईल’, अशी धमकी या कुटुंबाला देण्यात आली. राजू रविदास असे या परिवाराच्या प्रमुखाचे नाव आहे. त्यांचे कुटुंब गेल्या १०० वर्षांपासून या गावात रहात आहे. इंग्रजांच्या काळात बिहार राज्यातून त्यांचे पूर्वज येथे येऊन राहू लागले होते. पूर्वी या भागात शेकडो हिंदु कुटुंबे रहात होती; मात्र मुसलमानांच्या धमक्यांमुळे त्यांनी येथून पलायन केले. आता या संपूर्ण भागामध्येच केवळ १६ हिंदु कुटुंब राहिले आहेत.

राजू रविदास यांची एक एकर भूमी आहे. त्यांच्या शेजारी रहाणारा अब्दुल जलील लंबे याचा या भूमीवर डोळा आहे. त्याच्या कुटुंबात २५ जण आहेत, हे सर्वजण रविदास यांना धमकी देऊन रविदास यांच्या कुटुंबातील कुणालातरी मारहाण करतात. त्यांनी रविदास यांना घर सोडून जाण्याची धमकी दिली आहे. रविदास विवाहनिमित्त कुटुंबासह दुसरीकडे गेले असता, त्यांचे घर जाळण्यात आले. या घटनेचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यावर मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी रविदास यांना संरक्षण देण्याचा आदेश दिला. (हे मुख्यमंत्र्यांना का सांगावे लागते ? स्थानिक पोलिसांना कळत नाही का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूबहुल भागांत मुसलमामानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे पुरोगामी, साम्यवादी, काँग्रेसवाले अशा वेळी एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • एका गावात हिंदु अल्पसंख्यांक झाल्यावर मुसलमान काय करतात ?, हे हिंदूंनी लक्षात घेऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणे आवश्यक आहे !
  • अशा घटनांविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत !