सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांचा स्पर्श झालेल्या पायपुसण्याला स्पर्श केल्यावर साधिकेचा आध्यात्मिक त्रास न्यून होणे

सौ. रंजना गडेकर

‘एकदा माझा आध्यात्मिक त्रास वाढल्याने माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक आणि निराशाजनक विचार येत होते अन् ते थांबत नव्हते. काही वेळाने परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी दरवाजासमोर असलेले पायपुसणे ओलांडले. त्या वेळी त्यांचे चरण लागल्यामुळे पायपुसणे तिरके झाले. त्यानंतर मी ते सरळ केले. त्या वेळी पायपुसण्यातील चैतन्याचा माझ्या बोटांना स्पर्श झाला आणि माझा आध्यात्मिक त्रास न्यून झाला. माझ्या देहाला दैवी शक्तीचा स्पर्श झाल्याने देहातील त्रासदायक शक्ती नष्ट झाली. त्यामुळे माझ्या मनाच्या स्थितीत सकारात्मक पालट होऊन मन आनंदी झाल्याचे मला जाणवले.’

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०१९)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक