पुणे – चाकणमधील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी चाकण-शिक्रापूर मार्गावरील शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणारी सर्व प्रकारची वाहने तळेगाव, मुंबईकडे जाण्यासाठी माणिक चौकातून जुन्या पुणे मार्गाने वळवण्यात येत आहेत. मुटकेवाडी ते चाकण यांमध्ये एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. असे असतांनाही ९ डिसेंबर या दिवशी सायंकाळी एक अवजड कंटेनर मुटकेवाडी बाजूकडून चाकण बाजूकडे, विरुद्ध बाजूने भरधाव वेगात आला. रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनेक दुचाकी आणि एक बस यांना या कंटेनरने धडक दिली. यात अनेक दुचाकींची हानी झाली आहे. सुदैवाने यात कुणीही घायाळ झाले नाही; मात्र संतप्त नागरिकांनी वाहनचालकाला चोप देऊन या मार्गावरून अवजड वाहतूक वळवू नये, अशी मागणी केली आहे. चाकण पोलिसांनी कंटेनरसह चालकास कह्यात घेतले आहे. या रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबवण्यासाठी निवेदने देण्यात येतील.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे येथे विरुद्ध बाजूने आलेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक !
पुणे येथे विरुद्ध बाजूने आलेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक !
नूतन लेख
नक्षलवादी पोलिसांवर पुलवामाप्रमाणे घातक आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !
पालखी सोहळ्यातील वाहतुकीच्या नियोजनासाठी आळंदीमध्ये ७ ते १२ जूनपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी !
रहिमतपूर (जिल्हा सातारा) येथील सोहम् संप्रदायाचे अध्वर्यु पू. स्वरूपनाथ (बाबा) महाराज यांचा देहत्याग
हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे ! – विक्रम पावसकर
महाळुंगे पडवळ (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्यात आला !
अहिल्यानगर (नगर) येथील श्री विशाल गणपति मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ