मेक्सिको येथील ‘ग्वादालाहारा इंटरनॅशनल बुक फेअर’मध्ये सनातनचे ग्रंथ प्रदर्शित !

‘ग्वादालाहारा इंटरनॅशनल बुक फेअर’

नवी देहली – ग्ग्वादालाहारा (मेक्सिको) येथे वर्ष २०२१ मध्ये भरवण्यात आलेल्या ‘ग्वादालाहारा इंटरनॅशनल बुक फेअर’मध्ये (ग्वादालाहारा आंतराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात) सनातनचे ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले होते. भारत शासनाच्या ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने हे ग्रंथ या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यासाठी पाठवण्यात आले होते. या मेळाव्यात भारतातून पाठवण्यात आलेल्या ३३ प्रकाशकांच्या १६० पुस्तकांचा समावेश आहे.

या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात सनातनचे ‘विकार-निमूर्लनासाठी नामजप’ (इंग्रजी), ‘स्वतःतील स्वभावदोष कसे शोधावेत ?’ (इंग्रजी), ‘शांत निद्रेसाठी काय करावे ?’ (इंग्रजी), अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन (स्पॅनिश), तसेच ‘अहं-निमूर्लनासाठी साधना’ (इंग्रजी आणि स्पॅनिश) हे ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माहितीपुस्तकात मेक्सिको येथे प्रदर्शित पुस्तकांची माहिती देण्यात आली आहे.