बंटवाळ (कर्नाटक) येथे सरकारी भूमीवर रातोरात स्थापन करण्यात आला येशू ख्रिस्ताचा पुतळा !

हिंदु जागरण वेदिकेच्या चेतावणीनंतर प्रशासनाने पुतळा हटवला !

बंटवाळ (कर्नाटक) – अल्लीपादे येथे ‘संत जॉन चर्च’च्या बाजूला असलेल्या सरकारी भूमीमध्ये रात्रीच्या वेळी येशू ख्रिस्ताचा पुतळा बसवून त्याच्या भोवती भिंतीचे कुंपण घालून सरकारी भूमी बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला ‘हिंदु जागरण वेदिके’कडून चेतावणी देण्यात आली आहे.

_____________________________________ 

या संघटनेकडून नावूरू, अल्लीपादे पंचायत तालुका दंडाधिकार्‍यांना बांधकाम उखडून टाकण्यासाठी एका आठवड्यात मुदत देण्यात आली आहे. यानंतर तालुका प्रशासनाने पुतळा हटवला असून त्याच्या भोवतीची भिंतही पाडून टाकली आहे.

संपादकीय भूमिका

  • मुळात कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना धर्मांध ख्रिस्त्यांचे असे करण्याचे धाडस होतेच कसे ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !
  • जे हिंदूंच्या संघटनेला दिसते, ते या भूमीचे मालक असणार्‍या सरकारी यंत्रणेला कसे दिसत नाही ?