हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

श्रद्धा वालकर आणि निधी यांच्या मारेकर्‍यांना त्वरित फाशी द्या ! – धर्मप्रेमींची मागणी

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि धर्मप्रेमी अधिवक्ते

वाराणसी (उत्तरप्रदेश) – धर्मांध आफताब पूनावाला याने मुंबईतील श्रद्धा वालकर हिची देहलीत क्रूरपणे ३५ तुकडे करून हत्या केली. अशाच प्रकारे धर्मांतरासाठी सुफियान या धर्मांधाने लक्ष्मणपुरीमधील (उत्तरप्रदेश) निधीला ४ थ्या मजल्यावरून खाली फेकून तिची हत्या केली. त्यामुळे हिंदु मुलींच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा’ लागू करण्यात यावा, तसेच श्रद्धा वालकर अन् निधी यांच्या मारेकर्‍यांना त्वरित फाशी देण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

 उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि धर्माभिमानी अधिवक्ते

‘रुद्रशक्ती सेना नारी संघटने’च्या जिल्हाध्यक्षा सोनी सिंह, ‘महादेव महिला सेवा समिती’च्या खुशबू जायसवाल, ‘महावीर सेने’चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अरविंद गुप्ता, ‘हिंदु युवा वाहिनी’चे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पांडे, ‘राष्ट्रीय जनसेवा संघा’चे राष्ट्रीय प्रमुख महासचिव तथा ‘राष्ट्रीय मानवाधिकार आणि न्याय परिषदे’चे महासचिव अधिवक्ता अरुण कुमार मौर्य, ‘इंडिया विथ विझडम्’चे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता श्रीकांत प्रजापति, अधिवक्ता पराग कुमार, अधिवक्ता मनीष रॉय, अधिवक्ता विकास तिवारी, सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी उपस्थित होते.