कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधाकडून हिंदु भाजी विक्रेत्याला मारहाण !

कवर्धा (छत्तीसगड) – येथील लोहरा नाका चौक येथे अख्तर खान आणि जावेद यांनी हिंदु भाजी विक्रेते प्रकाश साहू अन् त्यांचे कुटुंबीय यांना मारहाण केल्याची घटना येथे १९ नोव्हेंबर या दिवशी घडली. यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये संताप निर्माण झाला असून त्यांनी ‘कवर्धा बंद’ची हाक दिली होती. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी लोहरा नाका चौक येथेच झेंडा लावण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश साहू हे लोहरा नाका चौक येथे भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. सध्या त्या ठिकाणी रस्ता बांधण्याचे चालू आहे. रस्त्याच्या कामासाठी लागणारे साहित्य तेथेच टाकले जात होते. यामुळे साहू यांनी ‘हे साहित्य त्यांच्या दुकानापासून थोडे लांब टाकावे’, असे ठेकेदाराला सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच वेळी आरोपी अख्तर खान तेथे पोचला आणि त्याने साहू यांना दमदाटी केली. साहू यांनी त्यास मध्ये न पडण्याविषयी सांगितले. यानंतर दोघांमधील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तेव्हा साहू यांच्या कुटुंबातील काही महिला तेथे आल्या. तोपर्यंत अख्तरने त्याच्या सहकार्‍यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी साहू यांच्यासह त्यांची बहीण राधिका आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य यांना मारहाण केली. पीडितांनी आरोप केला आहे की, आक्रमणर्त्यांनी त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी राधिका यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

अशा आरोपींना राज्य सरकारचे मंत्री महंमद अकबर हेच संरक्षण देत आहेत ! – भाजप

या प्रकरणी भाजपसह विहिंप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटन यांनी या राजनांदगाव येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. त्यांनी ‘पोलस आरोपींना संरक्षण देत आहेत’, असा आरोप केला. ‘अशा आरोपींना राज्य सरकारचे मंत्री महंमद अकबर हेच संरक्षण देत असून त्यांची त्यांच्या पदाचे त्वरित त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी भाजपचे मोतीराम चंद्रवती यांनी या वेळी केली.

संपादकीय भूमिका

लोकसंख्येने अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !