अमेरिकेच्या ‘नाईट क्लब’मधील गोळीबारात ५ ठार

मारेकर्‍याला अटक

कोलोरॅडो स्प्रिंग्स (अमेरिका) – येथील एका ‘गे नाईट क्लब’मध्ये १९ नोव्हेंबरला मध्यरात्री एका २२ वर्षीय तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५ जण ठार, तर १८ जण गंभीर घायाळ झाले. अँडरसन ली आल्ड्रिच असे आक्रमणकर्त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी या क्लबमधून २ बंदुका जप्त केल्या आहेत. अँडरसन याला दोन धाडसी माणसांनी रोखल्याचे सांगितले जात आहे. घायाळ झालेल्यांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.