आफताबला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी नगर येथे मोर्चा !

नगर – छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात माता भगिनी सुरक्षित होत्या; पण आता हिंदु जातीपातीमध्ये विभागले गेले. त्यामुळे आपले संघटन आणि शक्ती अल्प झाल्यामुळे आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहिल्या नाहीत, यासाठी सर्वानी एकत्र येणे आवश्यक आहे. आफताबला फाशीची शिक्षा देऊन देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी नगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

नगर येथील मोर्च्यात सहभागी झालेले हिंदू

हा मोर्चा जुने बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपासून जुना बाजार, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड मार्गे स्वा. सावरकर चौक, चौपाटी कारंजा या ठिकाणी समारोप करण्यात आला. या मोर्च्यात ३०० हून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते.